नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thacekray) यांचे बंधु श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई केल्यानंतर राज्यातील हालचालींना वेग आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे कुटुंबियांवर गंभीर आरोप केला आहे.
हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी (Nandakishor Chaturvedi) आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध काय असा सवाल किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) विचारला आहे. 2014 मध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि रश्मी ठाकरे यांनी तयार केलेली कंपनी नंदकिशोर चतुर्वेदीची कशी झाली असा सवाल त्यांनी विचारला. मुख्यमंत्र्यांची झोप उडाली असेल असा टोला सोमय्यांचा लगावला आहे.
संजय राऊत यांचं प्रत्युत्तर
किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिलं आहे. किरीट सोमय्यांनी जे आरोप केले ते काही देशाचे मुख्य न्यायमूर्ती झाले आहे का? असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने सिरीयल किलर असतात, रेपिस्ट असतात त्या पद्धतीनेच हे सीरियल कम्प्लेंट झालेले आहेत, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
ईडीचे अधिकारी फक्त आमच्याच मागे लागले आहे, काय तर म्हणे आमच्याकडे पैसे आहेत. भाजपच्या नेत्यांकडे काहीच पैसे नाहीत तर ते काय भीक मागत आहे का, केंद्रीय तपास यंत्रणांना हे जर दिसत नसेल तर त्यांचा चष्म्याच नंबर हा बदलावा लागेल अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
काही लोकांना दिलासा दिला जातो मात्र आमच्या तक्रारीवर काहीच होत नाही असाही गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकार ज्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न करतं त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळतो. परमवीर सिंग यांच्यासारख्या 25 लोकांना दिलासा मिळाला. मात्र , महाविकास आघाडीच्या कुठलाही नेत्यांना दिलासा मिळत नाही असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.