Sharad Pawar And Ajit Pawar: एकाच व्यासपीठावर येऊनही शरद पवार आणि अजित पवार एकमेकांशी बोलले नाहीत. बारामतीत कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दोन्ही नेते व्यासपीठावर बसलेले होते. मात्र एकमेकांशी बोलले नाहीत. इतकंच काय एकमेकांच्या शेजारी बसणंही दोन्ही नेत्यांनी टाळलंय. मात्र सुप्रिया सुळेंनी एक सूचक वक्तव्य केलंय.
बारामतीत झालेल्या कृषी प्रदर्शनात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले. मात्र दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे साधं पाहिलंसुद्धा नाही. बारामती कृषी विज्ञान केंद्रा अंतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलेलं आहे. इतकंच नाही तर संपूर्ण कार्यक्रमादरम्यान शरद पवार आणि अजित पवारांनी बोलणं टाळल्याचं पाहायला मिळालं. पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत दोन्ही नेत्यांमध्ये कुठलाच संवाद झाला नाही. त्यामुळे अजूनही सारं काही सुरळीत झालं नाही का, अशा चर्चा सुरू झाल्या.
खासदार सुप्रिया सुळेंनी मात्र यावर एक सूचक वक्तव्य केलंय. आज इलेक्शन नाही त्यामुळे वर्षभर एकमेकांशी गोड बोलूया, असं सूचक वक्तव्य सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.
अजित पवारांच्या फुटीनंतर राष्ट्रवादीसह पवार कुटुंबीयांतही उभी फूट पडली. कायम एकत्र साजरा केला जाणारा दिवाळीचा सणही दोन्ही पवारांनी वेगवेगळा साजरा केला. निवडणुकीदरम्यान दोन्ही बाजूनं टीकेचे बाण सोडले गेले. व्यक्तीगत पातळीपर्यंत हल्ले करण्यात आले. मात्र पवार कुटुंब एकच असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.
शरद पवार आणि अजित पवारांनी एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलं असलं तरी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार मात्र शेजारीच बसल्या होत्या. राजकारण आणि कुटुंब दोन्ही गोष्टी वेगळ्या असतात, असं पवार कुटुंबाकडून सांगितलं जातं. मात्र अजित पवारांच्या फुटीनंतर पवार कुटुंबात अंतर पडलंय, हेही खरंय. आता हे अंतर मिटवण्यासाठी कोण पुढाकार घेणार, हे पाहणं महत्त्वाच आहे.