Saif Ali Khan Attacker Demands 1 Crore: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सैफ अली खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी घुसखोरी करत हल्लेखोराने सैफ अली खानवर चाकूने हल्ला करत गंभीर जखमी केलं. सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. इमारतीमधील सीसीटीव्हीत तो कैद झाला आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून, त्याला पकडण्यासाठी 10 टीम गठीत करण्यात आल्या आहेत. यादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सैफवर हल्ला करणारा आरोपी त्याच्या मोलकरणीवर धारदार शस्त्र ठेवून 1 कोटींची मागणी करत होता. मोलकरणीची आरडाओरड ऐकून सैफ अली खान बाहेर आला आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. कशासाठी आला आहेस, काय पाहिजे? विचारले असता त्याने १ कोटींची मागणी केली. जोवर पैसै देत नाही तोवर कोणी घराबाहेर पडणार नाही असं आरोपीने काम करणाऱ्या महिलेला धमकावलं. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आहे.
- सैफ अली खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास एका आरोपी शिरला. आरोपी ज्या ठिकाणाहून घरात शिरला तिथे घर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची रूम होती आणि त्या रूमच्या बाजूला सैफ अली खानच्या मुलांची रूम आहे. आरोपी हा त्या रूमच्या बाजूने जात असताना घरकाम करणाऱ्या महिलेने पाहिलं, त्या महिलेने आरोपीचा पाठलाग केला आणि त्याला थांबवलं. यानंतर तिने आरडाओरडा सुरू केली. त्यावेळी आरोपींनी महिलेवर चाकूने हल्ला केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून सैफ अली खान वरच्या मजल्यावरून खाली आला.
सैफ अली खानला पाहताच आरोपीने महिलेच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि चाकूचा धाक दाखवून एक कोटींची मागणी केली अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर आरोपीने महिला लिमा फिलिप्स हिच्यावर चाकूने हल्ला केला. तिच्या हाताला मोठी जखम झाली. त्यानंतर सैफ आला असता त्याच्यावर हल्ला केला. सैफच्या मानेवर, खांद्यावर,पाठीवर आणि हातावर वार केले आणि पायऱ्यांवरून इमारतीबाहेर पळाला.
यानंतर सैफ आली खान आणि जखमी महिला कर्मचारी यांना रिक्षाने लीलावती रुगणालयात उपचारासाठी भरती केले. वांद्रे पोलिसांना याची माहिती मिळतात पोलीस सैफ अली खानच्या घरी रवाना झाले.