नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी पत्रकार परिषदेत प्रश्नांना उत्तरे न देण्याच्या कृतीचे शिवसेनेने समर्थन केले आहे. शुक्रवारी अमित शाहांसोबत मोदी प्रथमच पत्रकार परिषदेत दिसले खरे. पण त्यांनी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास स्पष्ट नकार दिला. या नकाराला त्यांनी पक्षशिस्त असे नाव दिले. यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने पंतप्रधानांच्या या कृतीचे समर्थन केले आहे.
ती अमित शाहांची पत्रकार परिषद होती आणि मोदी त्या पत्रकार परिषदेला पक्ष कार्यकर्ता म्हणून उपस्थित होते असं समर्थन शिवसेनेने केले आहे. त्यांनी विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान विविध घटकांशी त्यांच्या भाषणांमधून संवाद साधतात. बोलण्यापेक्षा काहीवेळा गप्प बसणे योग्य असते असे राऊत म्हणाले. केदारनाथासारख्या मंदिरांना भेट देणं ही हिंदू संस्कृती आहे, राजकारण नाही असेही राऊत म्हणाले.