मुंबई : विधानसभेत सकाळी प्रश्नोत्तराच्या तासात जालना, कोल्हापूर, इगतपुरी, सोलापूर, नागपूर या जिल्हयातील शिधावाटप केंद्रातील धान्याचा काळाबाजार होत असल्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात आतापर्यत वितरित करण्यात आलेल्या धान्याची आकडेवारी दिली. तसेच, केंद्र सरकारने मागणी केली होती त्यापेक्षा कमी धान्य वितरित केले. त्यामुळे धान्य वितरित करण्यात अडचणी आल्याचे सांगितले.
छगन भुजबळ यांनी दिलेले हे उत्तर ऐकून माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार संतप्त झाले. आम्ही अर्थमंत्री असताना राज्यातील जनता उपाशी राहू नये म्हणून अर्थसंकल्पात केली होती. आज अर्थसंकल्प आहे त्यामुळे आज तुमची कसोटी आहे. राज्यातील जनतेला काय देणार आहेत याची आम्ही वाट पहात आहोत.
सरकारमध्ये हिंमत असेल आणि जनतेचे सरकार असेल तर आजच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करालच. दर वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखविणार असाल तर राज्य आमचे सरकार आणू आणि आम्ही हे राज्य केंद्र सरकारकडे देऊ, असा इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.