नाशिकः दार उघडताच समोर दिसले हादरवणारे दृश्य; आई-वडिलांच्या डोळ्यांसमोरच....

Murder In Nashik: नाशिक जिल्ह्यात दिवसा ढवळ्या एका इसमाची हत्या करण्यात आली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 29, 2023, 06:47 PM IST
नाशिकः दार उघडताच समोर दिसले हादरवणारे दृश्य; आई-वडिलांच्या डोळ्यांसमोरच.... title=
someone finished 43 years old man over family dispute in nashik

Nashik Crime News: नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. आज नाशिक रोड परिसरात एका ४३ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. हत्येचा प्रकार पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  (Murder In Nashik)

विळी आणि काचेने वार

नाशिक रोड परिसरातील जेलरोड दुर्गा मंदिरासमोर एकाचा विळीने आणि काचेने वार करत हत्या करण्यात आली आहे. प्रवीण मधुकर दिवेकर असं मयत इसमाचे नाव आहे. प्रवीण हेपूर्वी मुंबईत वास्तव्यास होते. आता नाशिकमध्ये मुक्कामी आले होते. कौटुंबिक वादामुळे १५ ते २० दिवसांपासून ते एकटेच राहत होते. 

मुलाने केली होती आत्महत्या

गेल्या चार महिन्यापूर्वी त्यांचा मुलाने मुंबई येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नातेवाईकांकडून समजते. सकाळी मुंबईहून आई-वडील नाशिकला खरेदीसाठी आल्यावर मुलाला भेटण्यासाठी मुलाकडे घरी आले. तेव्हा प्रवीण दिवेकर हे जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले आढळून आले. 

२ वर्षांपूर्वी झाला होता एन्काउंटर, आता कबरीतून मृतदेह गायब, सत्य कळताच पोलिस हादरले 

दार उघडताच सापडला मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण दिवेकर यांनी जेवण केल्यानंतर फोनद्वारे नातेवाईकांना खुशालीदेखील विचारली होती. सकाळी मुंबईहून त्यांचे आई-वडिल नाशिकला आल्यानंतर प्रवीण यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. घरी आल्यावर दार उघडताच त्यांना धक्कादायक दृश्य दिसले. प्रवीण हे घरातच जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले होते. त्यांना अशा अवस्थेत पाहून आई-वडिलांच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यांनी तातडीने पोलिसांना फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. 

सीसीटीव्ही आधारे शोध

घटनेची माहिती मिळताच, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलिस आयुक्त अंबादास भुसारे, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे तसेच गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक चौकशी केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार, गुन्हा घडलेल्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. 

तरुणीवर चाकुने ४० वार, नंतर दगडाने ठेचून ठार केले, दिल्लीत भररस्त्यात थरार 

ज्या इमारतीत घटना घडली तिथे प्रवेश करण्याचे दोन रस्ते आहेत. पुढे असलेल्या रस्त्यावर सीसीटीव्ही यंत्रणा आणे मात्र, मागील रस्त्यावर कोणतीही सुरक्षा यंत्रणा नाहीये. त्यामुळं मागील रस्त्यांनेच मारेकरी फरार झाले असावेत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसंच, मारेकरी मयत प्रवीण यांच्या ओळखीचे असल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

कारण अद्याप अस्पष्ट

दरम्यान, प्रवीण यांच्या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. भररस्त्यात झालेल्या हत्येने नाशिक शहर हादरले आहे. हल्लेखोर तिथून फरार होण्यात यशस्वी झाले असले त्यांचा शोध घेण्यात येत आहे.