मुंबई : काळानुसार अश्लीलतेची परिभाषा बदललीय, असं मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय... डान्स बारसाठी नवीन परवाने देताना महाराष्ट्र सरकारनं केलेल्या कडक नियमांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय... या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयानं गंभीर ताशेरे ओढले. मुंबईत मॉरल पोलिसिंग सुरू आहे. सरकारच्या कडक नियमांमुळं डान्स बार चालवण्यात अडचणी येतायत, असं न्यायालयानं सांगितलं.
जुन्या चित्रपटात चुंबन आणि प्रेम दृश्यांसाठी दोन फुलं दाखवली जात होती आणि दोन पक्ष्यांच्या आवाजांचा वापर करण्यात येत होता. आता काळ बदललाय आहे, असं न्यायालयानं सांगितलं. याबाबतची पुढील सुनावणी २३ ऑगस्टला होणाराय.