बुलडाणा : Ravikant Tupkar agitation postponed : शेतकरी प्रश्नावर (farmer issue) आंदोलन करणारे 'स्वाभिमान'चे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांची तब्बेत बिघडली. त्यानंतर शेतकरी अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. तर दुसरीकडे आंदोनल ठिकाणी मोठ्या प्रमाणात फौजफाटा वाढविण्यात आला.
तुपकरांच्या आंदोलनामुळे पोलीस अॅक्शन मोडमध्ये दिसून आलेत. राज्य राखीव दलासह दंगा काबूचे पथक आंदोलनस्थळी दाखल झाले होते. पोलीस तुपकरांना उचलण्याच्या तयारीत होते. तर कॅबिनेट मंत्री डॉ. शिंगणेंच्या मध्यस्थीनंतर तुपकर यांनी आपले आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे. बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मागण्यांवर चर्चा होणार आहे. (Swabhimani Sanghatana leader Ravikant Tupkar's agitation postponed, discussion with Deputy Chief Minister Ajit Pawar)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकर यांना आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विनंतीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. बुधवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. ज्या काही मागण्या आहेत, त्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार, असा इशारा यावेळी तुपकर यांनी दिला आहे.
गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासन चांगलेच अॅक्शन मोडमध्ये आले होते. दरम्यान रविकांत तुपकरांनी अन्नत्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे त्यामुळे आता अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये याकरिता तुपकरांच्य घराभोवती पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. राज्य राखीव पोलीस दलासह दंगा काबू पथकाच्या देखील गाड्या याठिकाणी दाखल झाल्या होत्या. कोणत्याही वेळी पोलीस तुपकरांना ताब्यात घेऊ शकतात अशी याठिकाणी परिस्थिती होती. मात्र, त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.
पोलिसांच्या चोख बंदोबस्तासह महसूल प्रशासनाचे अधिकारी आणि विशेष म्हणजे राज्याचे कॅबिनेट मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी तुपकरांच्या आंदोलनाला भेट दिली. डॉ शिंगणे यांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली. शेतकऱ्यांना मागण्या रास्त असून यावर येणाऱ्या बुधवारी राज्य पातळीवरील चर्चा होणार असल्याची माहिती डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली तसेच आंदोलनकर्ते रविकांत तुपकर यांना उपोषण सोडण्याची विनंती केली.त्यामुळे सकारात्मक चर्चेतून लवकरच मार्ग निघेल या आशेपोटी तुपकरांनी आंदोलन स्थगित केले आहे.