Thane Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: ठाण्यातून नरेश म्हस्के आघाडीवर, राजन विचारे पिछाडीवर

ठाणे लोकसभा निवडणूक निकाल 2024 News in Marathi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बालेकिल्ल्यात नेमका काय निकाल लागणार याकडे फक्त राज्य नव्हे तर देशाचं लक्ष आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोघांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई असून, त्यात हा मतदारसंघ महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 4, 2024, 10:30 AM IST
Thane Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: ठाण्यातून नरेश म्हस्के आघाडीवर, राजन विचारे पिछाडीवर title=

Thane Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 in Marathi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यातील (Kalyan Lok Sabha Constituency) निकालाकडे फक्त राज्य नव्हे तर देशाचं लक्ष आहे. ठाण्यात शिंदे गटाचे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आणि ठाकरे गटाचे राजन विचारे (Rajan Vichare) यांच्यात लढत आहे. दोघे प्रबळ उमेदवार असल्याने ही लढाई रंगतदार होण्याची आशा आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई असून दोन्ही पक्षांची भविष्यातील वाटचाल ठरवणारा आहे. थोड्याच वेळात हा निकाल स्पष्ट होईल.
 
लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप होताना महायुतीमध्ये ठाण्यावरुन तिढा निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे या मतदारसंघासाठी आग्रही असताना दुसरीकडे भाजपाही या मतदारसंघावर दावा करत होतं. ठाणे मतदारसंघाच्या बदल्यात भाजपा रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघ देण्यास तयार असल्याची चर्चा होती. तसंच भाजपा गणेश नाईक यांना उमेदवारी देण्याची शक्यता असल्याने शिंदे गटाचे कार्यकर्ते नाराज होते. पण अखेर एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात हा मतदारसंघ पडला आणि नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाली. नरेश म्हस्के यांनाही काहीसा विरोध होत असताना त्यांनी विजयी करण्याची जबाबदारी स्वत: एकनाथ शिंदे यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती.

सविस्तर माहिती थोड्याच वेळात