virar accident news : जन्म आणि मृत्यू कोणाच्याच हातात नसतो. आईला रुग्णालायत भेटून घरी येत असताना तरुणाचा मृत्यू झाला आहे. मुंबई- अहमदाबाद महामार्गावर विरार फाट्याजवळ भीषण अपघात झाला. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे वडील आणि भाऊ गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आईची तब्ब्येत बघून घरी परतत असताना मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मुंबई अहमदाबाद महामार्गांवरील विरार फाट्याजवळ आज सकाळी एका भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच जागीच मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. विरार फाट्याजवळ एक आयसर टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा होता. यावेळी मोटारसायकलवरून तिघे स्वार भरधाव वेगाने टेम्पोला जोरदार धडकले. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवर स्वार चालक जागीचं ठार झाला. अक्षय महाले असं या मयत तरुणाचे नाव असून तो 19 वर्षांचा होता. त्याचा भाऊ प्रतिक महाले आणि वडील सचिन महाले हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्या दोघांना नालासोपाऱ्याच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भरधाव मिनी ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये शेतकरी पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना अकोला - नांदेड महामार्गावरील शिर्ला फाट्या जवळ घडलीय. अपघाता मधील मृत पुंडलिक निमकंडे आणि रत्ना निमकंडे हे पती-पत्नी आपल्या शेतातून घरी जात असतांना त्यांच्या बाईक ला भरधाव मिनी ट्रक ने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये पुंडलिक निमकंडे आणि रत्ना निमकंडे या शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाला आहेय. अपघाता नंतर मिनी ट्रक चालक वाहन घेऊन पसार झाला.
पुसद वरून पुणे जाणाऱ्या खाजगी बस मध्ये 50 च्या वर प्रवासी घेऊन जात असतांना वाशिम- पुसद महामार्गावर वाशिम शहराजवळ ट्रॅव्हल्स ने ट्रक ला मागून धडक दिली. ट्रॅव्हलचा चालक चालक मद्यधुंद स्थितीत आल्याने अपघात झाल्याचे बोललं जातं असून अपघात झाल्यानंतर सदर ट्रॅव्हलच्या चालकाने अपघात स्थळावरून पळ काढत निघून गेला.सुदैवाने या ट्रॅव्हल्सचा वेग कमी असल्यामुळे अपघातात चार-पाच प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून पन्नासाच्यावर प्रवासी थोडक्यात बचावले.मात्र खाजगी ट्रॅव्हलच्या अपघाताच्या वाढत्या घटना बघता परिवहन विभागाकडून खाजगी ट्रॅव्हलची नियमित तपासणी करून नियमबाह्य रोडवर चालणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कठोर कारवाई करण्याची प्रवाश्यांकडून केली जातं आहे.