थकबाकी महागात पडली; मागील निवडणुकीचा खर्च न भरल्यामुळे तब्बल 1014 उमेद्वार अपात्र

बीड जिल्ह्यामध्ये 1014 हून अधिक उमेदवारांवर अपात्र ठरवण्यात आले आहे. मागील निवडणुकीमध्ये निवडणुक लढवताना निवडणुकीचा जमाखर्च भरला नसल्यामुळे अचानक आज बीड जिल्ह्यामध्ये तहसील कार्यालयासमोर यादी लावण्यात आलेली आहे. या यादीमध्ये ज्या उमेदवारांनी आपला मागील निवडणुकी मधील खर्च भरला नाही अशांना अपात्र करण्यात आले आहे.

Updated: Dec 5, 2022, 04:12 PM IST
थकबाकी महागात पडली;  मागील निवडणुकीचा खर्च न भरल्यामुळे तब्बल 1014 उमेद्वार अपात्र title=

विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : बऱ्याचदा अनेकांना थकबाकीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बिड(Beed) जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुक(grampanchayat election) लढवणाऱ्यांना मात्र, याचा जबरदस्त फटका बसला आहे. मागील निवडणुकीचा खर्च न भरल्यामुळे उमेदवार अपात्र ठरले आहेत. शेकडो उमेदवार अपात्र ठरवल्यामुळे अनेक ठिकाणी बिनविरोध निवड होण्याची चिन्ह आहेत.  यादी जाहीर झाल्यानंतर यादीत आलेल्या अपात्र उमेदवारांचे निवडणूक आयोगाकडे न्याय मिळण्यासाठी धाव घेतली आहे. निवडणूक लढण्या अगोदरच हजारो उमेदवारांना यामुळे पराभव दिसू लागला आहे. 

बीड जिल्ह्यामध्ये 1014 हून अधिक उमेदवारांवर अपात्र ठरवण्यात आले आहे. मागील निवडणुकीमध्ये निवडणुक लढवताना निवडणुकीचा जमाखर्च भरला नसल्यामुळे अचानक आज बीड जिल्ह्यामध्ये तहसील कार्यालयासमोर यादी लावण्यात आलेली आहे. या यादीमध्ये ज्या उमेदवारांनी आपला मागील निवडणुकी मधील खर्च भरला नाही अशांना अपात्र करण्यात आले आहे.

या यादीत सरपंच पदाचे उमेदवार देखील अपात्र ठरले आहेत. ज्या ठिकाणी उमेदवार अपात्र ठरले आहेत त्या ठिकाणी आता बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे जे उमेदवार अपात्र ठरलेले आहेत त्यांनी आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. बीड आंबेजोगाई आणि शिरूर कासार या तीन तालुक्यातील उमेदवारांना याचा फटका बसला आहे.