प्रफुल्ल पवार / अलिबाग : रायगड (Raigad) जिल्ह्यातील अलिबाग समुद्र किनाऱ्याच्या (Alibag beach) सौंदर्यांत आता भर पडणार आहे. अलिबाग समुद्रकिनार्यावर ३७ टन वजनाचा भव्य रणगाडा (TKT 55 Rangada) बसविण्यात येणार असून आज पुणे खडकी येथील लष्करी कॅम्पमधून आज हा रणगाडा अलिबाग शहरात दाखल झाला आहे. लवकरच समारंभपूर्वक हा रणगाडा लोकार्पण सोहळा होणार असल्याचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले.
अलिबाग हे पर्यटन स्थळ आहे. अलिबागला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. त्याचबरोबर समुद्रात कुलाबा किल्ला असल्याने त्याच्या सौंदर्यांत भर पडली आहे. अलिबागचे हेच निसर्ग सौंदर्य, समुद्र किनारी मौज मजा करण्यासाठी आणि कुलाबा किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी अलिबागमध्ये येत असतात. तसेच समुद्राचा आनंद लुटतात. किल्ला वगळता सुमद्रकिनार्यावर पाहण्यासारखे काही नाही. परंतु लवकरच अलिबागच्या समुद्रकिनार्यावर 'वॉर ट्रॉफी' म्हणून बोलले जाणारा रणगाडा बसवण्यात येणार आहे.
'टीकेटी ५५' रणगाडा अलिबाग किनाऱ्याची शोभा वाढणार । अलिबाग समुद्रकिनार्यावर ३७ टन वजनाचा भव्य रणगाडा बसविणार । पुणे खडकी येथील लष्करी कॅम्पमधून आज हा रणगाडा अलिबाग शहरात दाखल झाला@ashish_jadhao https://t.co/Ct4fYeN6GF pic.twitter.com/pKDyQMMMew
— ZEE २४ तास (@zee24taasnews) November 20, 2020
अनेक युद्ध गाजवणारा हा रणगाडा पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल. रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी ही कल्पना मांडली आणि सर्व कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर ती पूर्णत्वास जात आहे . रणगाडा लावण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. टीकेटी ५५ प्रकारचा हा रणगाडा आहे. तिची लांबी २८ फूट असून रूंदी १२ फुट आहे. या तोफेचे वजन ३७ टन आहे. रणगाडा बसवण्यासाठी अलिबाग समुद्रकिनार्यावर असलेल्या विरंगुळा बागेच्या बाहेर चौथरा बांधण्यात आला आहे.
दरम्यान, तरुणाईला संरक्षण दलात जायला प्रेरणा देण्यासाठी तसेच अलीबागच्या प्रेक्षणीय समुद्र किनाऱ्याची शोभा वाढावी या दृष्टिकोणातून तिथे रणगाडा बसवण्याची संकल्पना मनात आली .त्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने आणि स्वप्नपूर्ती झाल्याने आज खूप आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया रायगडचे निवृत्त जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.