Ramdas Kadam : राज्यात सत्तांतरस्थापनेचा मोठा भूकंप झाल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतं आहेत.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे दोन गट तयार झाले आहेत. शिवसेना नेत आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेतून शिंदे गटावर (Ekanth Shinde Gorup) टीका केली. त्यावर शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी ठाकरे कुटुंबियांवर खरपूस समाचार घेतला.
रत्नागिरीतील (Ratnagiri) दापोलीमध्ये (Dapoli) शिंदे गटाकडून मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंसह (Aditya Thackeray) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार आहेत असं बोलताना रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केलाय. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंना आपण बाळासाहेबांचा (Balasaheb) मुलगा असल्याचा संशय आहे, असा खणखणीत प्रश्नही उपस्थित केला. (Treading news ramdas kadam on uddhav thackeray and Aditya Thackeray nm)
रामदास कदम एवढ्यावरच थांबले नाहीत तर, त्यांनी रश्मी ठाकरेंवरही (Rashmi Thackeray) निशाणा साधला. माँसाहेब कधीही कोणत्या व्यासपीठावर दिसत नव्हत्या, मग रश्मी ठाकरे का दिसतात? अशी विचारणा त्यांनी केली.