पुण्यातील प्रदुषण, वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्याचा प्रयत्न

पिंपळे सौदागरकरांचा सायकल ऑन रेंट या कल्पनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. 

Updated: Nov 29, 2017, 11:27 PM IST
पुण्यातील प्रदुषण, वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्याचा प्रयत्न title=

पुणे : आज काल भाजी घ्यायचीय, दूध घ्यायचे किंवा आणखी एखाद साधे काम असो, अनेकजण दुचाकी किंवा चारचाकी शिवाय बाहेर जात नाहीत...परिणामी वाहतूक कोंडी, प्रदूषण अश्या समस्या उद्भवतात...पण पिंपरी चिंचवड च्या पिंपळे सौदागर मध्ये त्यावर अनोखा उपाय शोधण्याचा प्रयत्न झालाय...काय आहे हा प्रयत्न पाहुयाय झी चोवीस तास चा विशेष रिपोर्ट...!

पुण्यातला पिंपळे सौदागर हा आयटीयन्सची वस्ती असलेला उच्च भ्रू परिसर..! त्यामुळं इथे प्रत्येकाच्या घरात चारचाकी आणि दुचाकी... अगदी भाजी आणि दूध आणायचं असेल, काही फुटांवर जायचं असेल तरी पुणेकर गाडीवरुनच जातात.....  अशा प्रकारे सगळ्याच पुणेकरांनी एवढ्या तेवढ्या कारणासाठी गाड्या बाहेर काढल्या की पुण्यात होतं GFX IN प्रदूषण, प्रदूषणामुळे आरोग्यावर दुष्परिणाम, वाहतूक कोंडी , वाहतूक कोंडीमुळे वाया जाणारा वेळ, आणि पार्किंगची समस्या..... एका आकडेवारीनुसार पुण्यात  दररोज 800 पेक्षा जास्त दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची नोंदणी होते.  GFX OUT  त्यामुळे पुण्यात दिवसेंदिवस ट्रॅफिक आणि प्रदूषणात भरच पडतेय.... पण या सगळ्यावर एक नवा उपाय पिंपळे-सौदागरमधल्या लोकांनी शोधलाय, तो म्हणजे सायकल ऑन रेंटचा....

ही सायकल तुम्ही एका रुपयात तासाभरासाठी वापरू शकता.. सध्या 50 सायकल भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहेत.. सौदागरच्या रोज लँड सोसायटीमध्ये या सायकली ठेवल्या आहेत.. GFX IN तुम्हाला फक्त इथं यायचंय, www.pedl.in वेबसाईट वर किंवा zoomcar app वर जायचं, GFX OUT  तुमचा पे टी एम रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा, सायकल वर असलेला क्यू आर कोड टाकायचा किंवा स्कॅन करायचा, मग ही सायकल अनलॉक होते... सायकल घ्यायची तुम्हाला हवं तिथे जायचं आणि काम झाल्यानंतर जिथून सायकल घेतली तिथे एंड ट्रिप हा ऑप्शन सिलेक्ट करून सायकल पार्क करायची...!विशेष म्हणजे प्रवासादरम्यान सायकल खराब झाली तर त्याची कुठलीही जबाबदारी तुमच्यावर नाही...

एकेकाळी पुणं हे सायकलींचं शहर होतं..... पण आता पुणं दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचं शहर झालंय. पण या बदलामुळे नागरी आणि शारीरीक समस्याही वाढल्यायत.  आता सायकल ऑन रेंटसारखे उपक्रम पुण्यात ठिकठिकाणी सुरू झाले, तर पुणेकरांनाच सर्वार्थानं त्याचा फायदा होणार आहे.