हेमंत चापुडे, झी मिडीया पुणे : जुन्नर ताक्यातील ओतुर जवळील हमीरघाट येथे शॉर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत होरपळून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवीरित्या मृत्यु झाला आहे. यामध्ये दोन चिमुकल्यांची प्रकृती गंभीर चिंताजनक आहे. कैलास ठाकुर हे शेतमजुराच्या रात्री दुध घालण्यासाठी बाहेर गेलेले असताना पाठीमागे घराशेजारील जनावरांच्या चाऱ्याला अचानक शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत जवळ खेळणारे चारही चिमुकले अडकले. या आगीत होरपळून दोन चिमुकल्या सख्या भावंडाना आपला जीव गमवावा लागला.
यामध्ये दोन जणांची प्रकृती गंभीर चिंताजनक असून त्यांच्या वरती पुण्यातील औंध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आगीत 4 वर्षाच्या भाग्यश्री कैलास ठाकुर व 2 वर्षाच्या शिवा कैलास ठाकुर या चिमुकल्यांना भावंडाना आपला जिव गमवावा लागला आहे.
४ वर्षांच्या नम्रता शुभम दमई आणि ८ वर्षाच्या ग्यानेंद्र शुभम दमई यांची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक आहे. त्यांच्या पुण्यातील औंध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या दुघटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.