प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचले

 विधानसभेनंतर भारिप-बहूजन महासंघाच्या वंचितमध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया 

Updated: Aug 28, 2019, 08:12 PM IST
प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचले  title=

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : राष्ट्रवादी कधीही भाजप सोबत जाऊ शकते. त्यामूळे त्यांना आम्ही निवडून देण्यासाठी का प्रयत्न करावेत? असा प्रश्न वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या वक्तव्याने प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

वंचित आणि एमआयएमचे संबंध अतिशय चांगले आहे. त्यामूळे या दोन्ही पक्षांत आघाडी होणारच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आपण कोणताही पक्ष फोडणार नाही, कुणी येत असेल तर खुशाल यावं असेही आंबेडकर यावेळी स्पष्ट केले. 

कॉंग्रेसशी आघाडीचा निर्णय येत्या 31 तारखेला घेणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. विरोधी पक्ष नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाला सत्तेत जनतेने येऊ द्यावे असे ते म्हणाले. 

दरम्यान, विधानसभेनंतर भारिप-बहूजन महासंघाच्या वंचितमध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया राबविणार असल्याचे आंबेडकर म्हणाले आहेत.