वसईकर तरुणीचा अमेरिकेत मृत्यू, रॉयल कॅरेबीयन शिपवर होती कामाला

Vasai girl Death:पुढच्याचं महिन्यात गणपतीसाठी ती वसईत परतणार होती. मात्र काल सोमवारी अचानक तिच्या छातीत दुखू लागले. यानंतर तिला हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Pravin Dabholkar | Updated: Aug 22, 2023, 06:22 PM IST
वसईकर तरुणीचा अमेरिकेत मृत्यू, रॉयल कॅरेबीयन शिपवर होती कामाला title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार: नालासोपाऱ्यातील भांडारआळी येथे राहणाऱ्या तरुणीचा अमेरिकेत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रुही भूषण राऊत असं या तरुणीचे नाव असून ती गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकेत रॉयल कॅरेबीयन शिपवर कामावर होती.

पुढच्याचं महिन्यात गणपतीसाठी ती वसईत परतणार होती. मात्र काल सोमवारी अचानक तिच्या छातीत दुखू लागले. यानंतर तिला हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या तिचे पार्थिव शरीर अमेरिकेत असून ते भारतात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.त्यानंतर वसईत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रुहीच्या अश्या जाण्याने तिचे कुटुंबीय, नातेवाईक आणि वसईकरांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

गर्लफ्रेंडला लॉजवर घेऊन गेला नागपूरचा बॉयफ्रेंड, सकाळी झाला मृत्यू; 'हे' होतं कारण!

वसईतील खड्ड्याने घेतला तरुणीचा बळी 

दुसऱ्या एका घटनेत मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्याने 27 वर्षीये महिलेचा बळी घेतला आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पूजा गुप्ता असं या विवाहित महिलेचे नाव असून ती मालाड पश्चिम परिसरात राहते. वसईतील मामेबहिणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती आपल्या दिरासह दुचाकीवरून वसईच्या वालीव येथे जातं होती.

गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांची घराच्या सोडतीसंदर्भात मोठी घोषणा

रात्री 9 च्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बापाणे पूलावरून दुचाकी खाली उतरत असताना मध्येच असलेल्या खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली. यावेळी मागे बसलेली पूजा खाली पडली आणि तिच्या डोक्याला दुखापत झाली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू होते. उपचारादम्यान पूजाचा मृत्यू झाला. नायगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकास्मित मृत्यू नोंद करण्यात आली आहे.