नाशिक : नाशिकच्या बाजारसमितीत भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. कुठतेरी बळीराजा पाऊस पडल्याने सुखावला होता. आपल्याकडील शेतमालाला भाव मिळायला सुरुवात झाली होती. मात्र मुंबईला पाऊस जास्त असल्याने नाशकात व्यापारी माल घेण्यास धजावत नाहीये. त्यामुळे नाशिकच्या बाजारसमितीत मोठ्या प्रमाणात माल पडून राहिला आहे.
पाऊसामुळे शेतकरी सुखावतो. मात्र भाजीपाला घेऊन आलेल्या मालला उठाव कमी असल्याने नाशिकच्या बाजार समितीत बळीराजा नाराज झाला आहे. कोकण, मुंबई, ठाणे, कल्याण अशा ठिकाणी पाऊस झाल्याने तेथील शेतकर्यांचे नुकसान झाले होते. त्यावेळी नाशिकच्या बाजारसमितिमध्ये मोठ्या प्रमाणात भाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या आठवड्यात बर्यापैकी शेतमालाला उठाव होता आता तो नसल्याने शेतकरी मुंबईकडील व्यापारी आपला माल घेण्यास कधी येईल अशी वाट पाहू लागला आहे.
बाजारसमितीने शेतीमालाचा उठाव व्हावा यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला. मात्र यावेळी पाऊस कमी जास्त प्रमाणात होत असल्याने माल खराब होतो त्यामुळे व्यापारी माल घेण्यास हिम्मत करत नाही. तर काही मोजक्याच भाज्यांना भाव मिळत असल्याचे बाजारसमितीने सांगितलं आहे.
दरम्यान नाशिकच्या बाजार समितीत शेतकरी भाजीपाला टिकाऊ असल्याचा दावा करत आहे. तर मुंबईकडील व्यापरी माल खराब होईल याभीतीने घेत नसल्याने आतातरी व्यापार्यांनी माल घ्यावा. त्यामुळे शेतकर्याला देखील चांगला मोबदला मिळेल.