लातूर : उन्हाळा म्हणजे आंब्याचा मोसम... तुम्हा आम्हाला जसे आंबे खायला आवडतात तसा माकडांनाही आंब्याचा मोह आवरत नाही... लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील राजेवाडी शिवारात वानरांची दररोज 'मँगो पार्टी' सुरु असलेली दिसतेय. या परिसरातील आंब्याच्या झाडांवर वानरांच्या झुंडीच्या झुंडी 'मँगो पार्टी' करताना दिसतात. झाडाखाली बसून पाडाला आलेले आंबे ही माकडं खाऊन फस्त करत आहेत. त्यांच्या 'मँगो पार्टी'ची ही दृश्यं 'झी २४ तास'च्या कॅमेऱ्यात कैद झालीत.
झाडाचा तोडलेला आंबा हा पिकलेला नसल्यामुळं पाडाचा आंबा खाण्यासाठी या वानरांमध्ये मोठी चढाओढ असल्याचेही दिसून येते. एकूणच उन्हाळ्याचा हा आंब्याचा सिझन वानरांसाठी मोठी पर्वणीच ठरल्याचं दिसून येतंय.