MPSC Pune Darshana Pawar : रविवारी सर्वजण साखरझोपेत असताना पुणे जिल्ह्यातील (Pune News) राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी नुकतंच एमपीएससी (MPSC) पास झालेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) हिचा मृतदेह आढळून आलाय. पोस्टमॉर्टम अहवालातून तिची हत्या झाल्याचं समोर आलं अन् एकच खळबळ उडाली. तिचा मित्र राहुल हंडोरे (Rahul Handore) गायब असल्याने पोलिसांचा संशय थेट त्याच्याकडे वळाला. पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्हीमधून संशय अधिक बळावला आणि पोलिसांनी पाच पथक नेमून आरोपी राहुल हंडोरेला अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
राहुल हंडोरेला अटक करणं पोलिसांसाठी गरजेचं होतं. मात्र, राहुल वेगवेळ्या राज्यातून पळ काढत होता. त्यामुळे त्याचं अचूक लोकेशन शोधता येत नव्हतं. त्यावेळी पोलिसांनी योजना आखली आणि पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना ऑनलाईन पैसे पाठवण्यास सांगितलं. त्यानंतर त्याचा शोध घेतला गेला. पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुलला अंधेरीवरून अटक केली. मात्र, दर्शना पवार अन् राहुल हंडोरे यांच्यात नेमकं काय झालं? यावर आता खुलासा झाला आहे.
राहुल हंडोरे अन् दर्शना पवार (Darshana Pawar Murder Case) हे दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. राहुलचं मात्र दर्शनावर प्रेम जडलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दर्शना पवार राज्यात तिसऱ्या क्रमांकानं उत्तीर्ण झाली होती. तेव्हापासून तिच्या वागण्यात राहुलला बदल जाणवू लागला. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दर्शना राहुलपासून लांब राहू लागली, असं राहुल हंडोरे याच्या मित्रांनी सांगितलंय. राहुलने दर्शनाला लग्नाची मागणी घातली होती. मात्र, दर्शनाने लग्नाचा प्रस्ताव फेटाळला, त्यामुळे राहुल नाराज राहत होता, असं त्याचे मित्र सांगतात.
दरम्यान, आरोपी राहुल हंडोरेला पोलिसांकडून (Pune Police) अटक करण्यात आली आहे. मुंबई येथून हंडोरेला अटक करण्यात आली आहे. तो मुंबईवरुन पुण्याकडे जाण्यासाठी निघाला होता. लग्नाला नकार मिळाल्याने राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केली आहे. दर्शनाच्या हत्येनंतर चार दिवसांनी त्याला अटक करण्यात आली. राजगडाच्या पायथ्याशी चार दिवसांपूर्वी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. त्यानंतर पोलिसांनी दर्शना पवारची ओळख पटवून तपासाला सुरुवात केली. राहुल हंडोरे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने दर्शना पवार हिच्या हत्येची कबुली दिली आहे. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते, अशीही त्याने माहिती पोलिसांनी दिली.