रत्नागिरी : कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्पाबाबत रत्नागिरीतून एक बातमी समोर आलीय. रत्नागिरीतील राजवाडी, वाडा, पाणेरी गावात उत्खनन केलं जात आहे. या उत्खननाला ग्रामस्थांनी विरोध केलाय.
रिफायनरीबाबत अदयाप कोणताही अध्यादेश निघालेला नाही, असे असताना कंपनीकडून खोदकाम सुरू करण्यात आलंय. याबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. जमीन अधिग्रहण झाली नसतानादेखील उत्खनन कोण करतंय याचा शोध घेतला जात आहे.
या उत्खननाविरोधात ग्रामस्थ आणि विरोधी समितीने तहसीलदार यांच्याकडे तक्रार दिली आहे. हे उत्खनन करण्याचे आदेश कुणी दिले याची विचारणा ग्रामस्थांनी केली. मात्र, याबाबत स्थानिक प्रशासनाने माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशासनाला अंधारात ठेऊन हे काम करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.