राज्यात 'या' दिवशी अतिवृष्टीचा इशारा

मच्छीमारांनाही सतर्कतेचा इशारा

Updated: Nov 3, 2019, 08:15 PM IST
राज्यात 'या' दिवशी अतिवृष्टीचा इशारा title=
संग्रहित फोटो

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे येत्या ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान, राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे, समुद्रात वाऱ्याचा वेगही अधिक असल्याने मच्छीमारांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे विभागातील सर्व जिल्हा यंत्रणांना उपाय-योजनेसह तयारीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

  

नोव्हेंबर उजाडला तरी पाऊस सुरुच आहे. परतीच्या पावसाने राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शेतात काढणीच्या वेळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक शेतात पाणी शिरल्याने पिकं सडली आहेत. द्राक्षांच्या बागा, भात पिक, ज्वारी, सोयाबिन पिकांचं चांगलंच नुकसान झालं आहे. हाता-तोंडाशी आलेलं पिकं असं वाया गेल्याने बळीराजा पुरचा कोलमडला आहे. आता पुन्हा हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उरलेल्या पिकाची धास्ती निर्माण झाली आहे.