३४ हजार कोटींची कर्जमाफी, १.५ लाखांचे सरसकट कर्जमाफ - मुख्यमंत्री

राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय. ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीला मान्यता देण्यात आली आहे. 

Updated: Jun 24, 2017, 05:11 PM IST
३४ हजार कोटींची कर्जमाफी, १.५ लाखांचे सरसकट कर्जमाफ - मुख्यमंत्री title=

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय. ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीला मान्यता देण्यात आली आहे. तसेच दीड लाख रुपयांचे कर्ज सरसकट माफ करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कर्जमाफीच्या मुद्द्यावर मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे. कर्जमाफीमुळे ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची मदत करणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  

तसेच ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितले. नियमित कर्ज भरणाऱ्यांना २५ हजारांपर्यंत अनुदान मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या योजनेला छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान असे नाव देण्यात आले आहे.  
 

झी २४ तास LIVE अपडेट

 
मुंबई :  ३४ हजार कोटींची कर्जमाफी  - मुख्यमंत्री   
- ९० टक्के शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार आहे - मुख्यमंत्री   
- दीड लाखांचे सरसकट कर्ज माफ करतोय, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करत आहोत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
- कर्जमाफीवर आज मोठा निर्णय घेत आहोत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
-  राज्यात अडचणीत असलेला आणि कर्जात जो शेतकरी बुडालाय अशी शेतकऱ्याला कर्जमाफी करण्याची मागणी होत होती. त्यांना मदत करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत, त्यानुसार प्रत्येक घटकाशी चर्चा केली. सर्वच क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली, काहीवर एकमत  झाले, काहींवर होऊ शकले नाही, सर्वच राजकीय पक्षांशी चर्चा केली, शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- शेतक-यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी 

- दीडलाखापर्यंतच कर्ज सरसकट माफ
- ९०टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे 
- ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार.
- नियमित कर्ज भरणाऱ्यांना २५ हजारांपर्यंत अनुदान 
- राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना कर्जमाफी नाही
- ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ   
- लोकप्रतिनिधी, आमदारांना कर्जमाफी नाही
- या कर्जमाफीमुळे विकासकामांवर थोडा परिणाम होणार आहे.