महाराष्ट्रीयन मुलीशी लग्न करण्याची 'ही' ९ कारणं

महाराष्ट्राला सुरूवातीपासूनच एक इतिहास राहिला आहे. आणि या महाराष्ट्रातील मुलींबद्दल, स्त्रींयाबद्दल एक वेगळाच आदर समाजात आपल्याला पाहायला मिळतो.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 31, 2017, 08:10 PM IST
महाराष्ट्रीयन मुलीशी लग्न करण्याची 'ही' ९ कारणं title=

मुंबई : महाराष्ट्राला सुरूवातीपासूनच एक इतिहास राहिला आहे. आणि या महाराष्ट्रातील मुलींबद्दल, स्त्रींयाबद्दल एक वेगळाच आदर समाजात आपल्याला पाहायला मिळतो.

शिवाजी महाराजांचा काळापासून महाराष्ट्रातल्या म्हणजे मराठी मुलीची एक वेगळी इमेज निर्माण झालेली आहे. अगदी सईबाईंपासून ते रमाबाईंपर्यत साऱ्याच महिलांनी एक वेगळा इतिहास रचला आहे. त्यामुळे तुम्ही जर महाराष्ट्रीयन / मराठी  मुलीशी लग्न करत असाल तर तुम्ही स्वतःला खूप लक्की समजा.

कारण महाराष्ट्रीय मुली या खूप मुक्त विचारांच्या आणि आपल्या स्वप्न पूर्ण करण्याची ताकद ठेवणाऱ्या असतात. त्यांच्या या स्वभावाचा फायदा मुलाच्या कुटुंबियांना आणि त्याला स्वतःला नक्की होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या महाराष्ट्रीयन मुलीला डेट करत असाल किंवा महाराष्ट्रीयन मुलीशीच लग्न करण्याचा विचार करत असाल. तर नक्की पुढे जा.....

23

१) मराठी मुलगी ही कायम नऊवारी आणि सहावारी साडी नेसण्यास सज्ज असते. आणि या लूकमध्ये मुली अधिक सुंदर आणि हॉट दिसतात. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही त्या मुलीच्या प्रेमात पडाल.

35 (1)

२) तुम्ही महाराष्ट्रीयन लोकांकडे कधी जेवला आहात का? उत्तम चवीचं जेवणं तुम्हाला महाराष्ट्रीयन घरी जेवायला मिळेल. आणि या कुटुंबियांमध्ये अतिथी देवो भव... हे महत्वाचं मानलं जातं. महाराष्ट्रीयन मुली मिसळ पाव, वडा पाव, वरण भात तुपासोबत. कटाची आमटी, कोल्हापूरी मटण, आमरस, मालवणी स्टाईलचं फिश, पुरणपोळी यासारखे असंख्य स्वादिष्ट पदार्थ तयार करतात.

36 (1)

३) या मुली जगाच्या पाठीवर कुठेही गेल्या तरी त्या आमची मुंबई कधीच विसरत नाही. त्यामुळे महाराष्ट्रीयन मुली परदेशी सेटल व्हायला हट्ट तर करणार नाही ना असा प्रश्न तुम्हाला पडणार नाही.

34

४) महाराष्ट्रीयन मुलीशी लग्न केल्यास तुमचे सण कधीच साधे साजरे होणार नाहीत. कारण महाराष्ट्रीयन लोकांमध्ये अनेक सण साजरे करतात आणि ते अतिशय आनंदात, उत्साहात साजरे केले जातात. यातील दिवाळी, गुढीपाडवा, गणेशोत्सव यासारखे सण अतिशय आनंदात साजरे केले जातात. त्यामुळे विश्वास ठेवा तुम्ही कधीच हे सण विसरू शकणार नाही.
Image Credit - Indian Express 

24

५) महाराष्ट्रीयन मुली या अतिशय विनम्र आणि जुळवून घेणारा असतात. महाराष्ट्रीयन महिला कधीच मागणी करत नाही. तसेच त्या सर्व परिस्थितीत तडजोड करायला तयार असतात. त्या महाराष्ट्रीयन मुली या उच्चशिक्षित आणि संस्कृती जपणाऱ्या असतात.
Image Credit - Samography 

33

६) महाराष्ट्रीयन मुली पतीच्या दिर्घायुष्यासाठी त्या प्रार्थना करतात. उपवास करतात. त्या पतीला कधीच त्रास देत नाहीत. तसेच गौरी गणपतीमध्ये येणारा ओवसा हा सण देखील या महिला आनंदाने साजरा करतात.
Image Credit - Santosh Taakale Facebook Page 

30

७) महाराष्ट्रीयन मुली या अतिशय ट्रेडिशनल असतात. मात्र त्यांचे विचार ही अगदी मॉर्डन जगाला सुट होणारे असतात. महाराष्ट्रीयन मुली मोठ्यांचा आदर करतात, वाकून पाया पडतात याचा अर्थ असा नाही की त्यांना फॅशनचा सेन्स नसतो.
Image Credit - Samography 

29

८) महाराष्ट्रीयन मुलींसाठी मंगळसूत्र आणि हिरव्या बांगड्यांचा चुडा अतिशय महत्वाचा असतो. त्याच्यावर त्यांचा अतिशय विश्वास असतो. त्यांचा असा समज असतो की या गोष्टी त्यांच्या पतीचं रक्षण करणाऱ्या असतात.
Image Credit - Samography 

31 (1)

९) महाराष्ट्रीयन मुलगी या एकत्र कुटुंब पद्धतीत सामावणाऱ्या असतात. त्यांना जॉईन कुटुंबाचे महत्व अतिशय चांगल्या पद्धतीने कळते.
Image Credit - Samography