दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेनेत बढती मिळण्याची जोरदार चर्चा आहे. येत्या मंगळवारी पक्षाची मुंबईत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे.
त्यामध्ये आदित्य ठाकरे यांची नेते पदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. याच कार्यकारिणी बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख पदावर फेरनिवड केली जाणार आहे.
पक्षप्रमुख पदानंतर शिवसेनेत नेते पद हे महत्वाचं पद आहे. सध्या पक्षात 8 नेते आहेत. नेत्यांची संख्या वाढवण्याचीही शक्यता व्यक्त होतेय.
त्यामुळे या पदावर वर्णी लागावी यासाठी इच्छुकांची पक्षांतर्गत जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.
वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर हा राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचा कार्यक्रम पार पडणार आहे.