मुंबई : मागच्या २४ तासांमध्ये मुंबईला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. मुंबईत पडलेल्या या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं. मुंबईत उद्भवलेल्या या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका मुख्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट दिली.
'अजून २ पम्पिंग स्टेशन करणार आहोत, पण पम्पिंग स्टेशनच्या पुढे जाऊन विचार करावा लागेल. फ्लड कंट्रोल टँक उभारण्याबाबत प्रयत्न सुरु केले आहेत,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.
सप्टेंबर महिन्यात जेवढा पाऊस होतो, तितका पाऊस फक्त ८ ते १२ तासात झालाय. या काळात ८३ टक्के पाऊस पडला आहे. धारावी आणि दादर परिसरात ३३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.
Visited the @mybmc HQ today to take stock of the situation after the torrential rains that lashed the city over the last night.
• Parts of Mumbai have received over 83% of the annual normal September rainfall in less than 12 hours.
• flood water pumped out= 1 Tulsi lake pic.twitter.com/9HbDCv06MA— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 23, 2020
५० आणि २५ मिमीची ड्रेनेज सिस्टिम आहे. आपत्कालीन घटना या वारंवार घडत आहेत. १२ तासात एक तुलसी लेक एवढा पाणी उपसा केला आहे. पाऊस पडल्यावर पुढे काय करायचं, यावर चर्चा केली. हा हवामान बदलाचा परिणाम दिसतोय, असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं.
माझ्या वरळी मतदारसंघातील पोलीस वसाहतीत भिंत कोसळली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. तेथील स्थानिकांशी चर्चा करून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांना योग्य निर्देश दिले.यावेळी @misunilshinde जी, नगरसेवक @AshishChemburkr जी,आयुक्त चहल जी सोबत होते. pic.twitter.com/O2dzAOhAO7
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 23, 2020
कालच्या मुसळधार पावसानंतर मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल जी यांच्यासोबत वांद्रे येथील @mybmc च्या मिनी पंपिंग स्टेशन ची पाहणी केली. pic.twitter.com/L7zCgLEBUt
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 23, 2020
मुंबईत सकाळी १० पर्यंत २४ तासात पडलेला पाऊस (सौजन्य मुंबई महापालिका ऍप)
मुंबई सेंट्रल - 166 mm
वांद्रे पश्चिम - 232 mm
हाजी अली - 269 mm
हिंदमाता - 289 mm
कांदिवली पश्चिम - 302 mm
किंग्ज सर्कल - 310 mm
मंत्रालय - 169 mm
मुंबई डोमेस्टीक एअरपोर्ट - 239 mm
मुंबई पालिका मुख्यालय परिसर - 313 mm
शिवडी - 325 mm
धारावी - 312 mm
वडाळा - 199 mm
मुलुंड रेल्वे स्टेशन परिसर - 184 mm