मुंबई : कर्जमाफीचा फायदा मिळणा-या शेतक-यांची नावं आणि पत्ता विधानसभेत जाहीर करण्याची मागणी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
कर्जमाफी झाल्यांनतरही विदर्भ आणि मराठवाड्यातील सुमारे २०० शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. राज्यातील शेतक-यांची गंभीर परिस्थिती बघता राज्यसरकारनं त्यांना मदत करावी ही मागणी शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केली आहे.
त्याआधी नगरसेवकांना विकास निधी दिला जात नाही, अशी तक्रार घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी 'वर्षा' या बंगल्यावर गेले होते. यावेळी उद्धव यांनी त्यांच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या.