Mumbai Trans Harbour Link: अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावाशेवा अटल सेतू (एमटीएचएल) या मार्गावर एम एम आर डी ए. विभागाकडून शिवडी गाडी अड्डा मुंबई ते चिर्ले, नवी मुंबई या मार्गावर मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे १७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ पासून १८ फेबुवारी रोजी दुपारी १ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक 12 जानेवारीपासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. पहिल्याच महिन्यात या पुलावरुन अनेक मुंबईकरांनी प्रवास केला आहे. तसंच, या पुलामुळं मुंबई ते नवी मुंबई अंतरही कमी झाले आहे. अशातच आता रविवारी अर्धा दिवस मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रवाशांसाठी बंद राहणार आहे. या कालावधीत या कालावधीत मुंबई ते शिवाजीनगर उलवे इथं उतरण्यासाठी असणारे रॅम्प तसंच शिवाजीनगर उलवे ते मुंबईकडे चढणारे रॅम्प या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्यात येणार आहेत.
रविवारी १८ फेबुवारी रोजी दुपारी १ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं प्रशासानाने पर्यायी मार्गही उपलब्ध करुन दिले आहेत. पर्यायी मार्ग म्हणून उरण कडून येणाऱ्या वाहनांसाठी गव्हाणफाटा, उरणफाटा, वाशी मार्गे, पुण्याहून अटल सेतूने मुंबईकडे जाणारी वाहने ही यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाने बेलापूर, वाशी मार्गे जुना मुंबई-पुणे हायवे, कोकणाकडून येणारी वाहने तसेच पनवेलकडुन येणारी वाहने ही गव्हाणफाटा उरणफाटा वाशी मार्गे पुढे इच्छीत स्थळी मार्गस्थ होणार असल्याची सूचना नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली आहे
मुंबईतील बहुचर्चित आणि प्रतिक्षित असलेल्या कोस्टल रोडचे लोकार्पण पुन्हा एकदा लांबले आहे. 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण होणार होते. पण पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्याने आता कोस्टल रोडचे लोकार्पण लांबले आहे. फेब्रुवारी महिनाअखेर कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत सुरू होणार आहे, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. तेव्हाच कोस्टल रोडच लोकार्पण करण्यात येणार आहेत. वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यान एक मार्गिका लवकरच होणार सुरू आहे.