मुंबई : महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी पी श्रीधरन यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आलं. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कोरोना संसर्गामुळे कोश्यारी यांच्याकडे असलेला महाराष्ट्राच्या राज्यापाल पदाची जबाबदारी इतर राज्यांच्या राज्यपालांकडे जाऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा कारभार गोव्याकडे जाण्याची चिन्हं आहेत. गोव्याचे राज्यपाल पी श्रीधरन यांच्याकडे चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे.
तिकडे गुवाहाटी येथे असलेले शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदार महाविकास आघाडीमधून बाहेर पडत असल्याचे पत्र राज्यपालांना देऊ शकतात. याचाच अर्थ शिंदे आजच महाविकास आघाडीवर प्रहार करून सरकारमधून बाहेर पडू शकतात.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये समन्वयाची जबाबदारी भाजपचे संजय कुटे, मोहित कंभोज, रविद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हे स्वतःचा वेगळा गट स्थापन करण्याची माहिती राज्यपालांना देणार असल्याचे सूत्रांनी म्हटलंय. हा गटच शिवसेनेचा असल्याचं सांगून राज्यात मोठा राजकीय भूंकप घडण्याची तयारी आहे.