दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील दोन लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात भंडारा - गोंदिया आणि पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा समावेश आहे. या दोन जागांसाठी २८ मे रोजी मतदान पार पडेल, तर ३१ मे रोजी मतमोजणी करण्यात येईल. या दोनही ठिकाणी भाजपचे खासदार निवडून आले होते, तेव्हा या जागा पुन्हा भाजपकडे शाबूत राखण्याचं मोठं आव्हान भाजप समोर आहे. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघातून नाना पटोले खासदार म्हणून निवडून आले होते, मात्र नाना पटोले यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने भंडारा-गोंदियाची जागा रिक्त झाली आहे, तर पालघरचे भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरची जागा रिक्त झाली आहे
.
या दोनही जांगावर दोन्ही जागा भाजपाच्या ताब्यात होत्या, पलुस-कडेगाव विधानसभा जागेसाठीही पोटनिवडणूक देखील होणार आहे. कांग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे.