मुंबई : महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आज लगेचच मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
- कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-3 प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता (नगरविकास विभाग)
- अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना राज्य शासनाचा मोठा दिलासा. दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत
- शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानासाठी जी रक्कम NDRF कडून दिली जाते त्याच्या दुप्पट रक्कम दिली जाणार आहे (मदत व पुनर्वसन विभाग)
- रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास मान्यता (वैद्यकीय शिक्षण विभाग)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आपले मंत्रिमंडळ हे लोकांच्या हितासाठी आणि अगदी शेवटच्या घटकापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी प्रयत्न करेल, त्यामुळे आपआपली जबाबदारी गांभिर्यपूर्वक पार पाडावी आणि महाराष्ट्राचा देशात नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा नव्या मंत्र्यांकडून व्यक्त केली.