मुंबई : मंत्रालयामधले उंदीर मारण्याचा कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलाय. मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर उंदीर मोजण्याची मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी 3 लाख 19 हजार 400 उंदीर मारण्यात आले. हे उंदीर मारण्यासाठी सहा महिन्याचं कंत्राट देण्यात आलं. त्यानंतर हा कालावधी दोन महिन्यांचा करण्यात आला. प्रत्यक्षात सात दिवसांतच मंत्रालयातल्या सर्व उंदरांचा बंदोबस्त करण्यात आल्याचं सांगत खडसेंनी हिशेब मांडला.
मुंबई महापालिका दोन वर्षामध्ये 6 लाख उंदीर अख्या मुंबईत मारते. पण मंत्रालयात उंदीर मारण्याचा विक्रम केल्याबद्दल भ्रष्ट अधिकाऱ्यांना पारितोषिक देणार का? असा खोचक सवाल खडसे यांनी केलाय. मंत्रालयातील उंदीर मारण्याचा कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत खडसे यांनी आज विधानसभेत खळबळ उडवून दिली. मंत्रालयात एका मिनिटाला 31 उंदीर, तर सात दिवसात 3 लाख 19 हजार 400 उंदीर मारण्याचा विक्रम केल्याचं सांगत खडसेंनी मंत्रालयातच सुरू असलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला. मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर उंदीर मोजण्याची मोहीम हाती घेण्यात आली.
या मोहीमेत मंत्रालयात 3 लाख 19 हजार 400 उंदीर मारण्यात आले. हे उंदीर सहा महिन्यात मारण्याचं कंत्राट देण्यात आलं. नंतर हा कालावधी दोन महिन्यांचा करण्यात आला. पण प्रत्यक्षात सात दिवसातच मंत्रालयातले सर्व उंदीर मारण्यात आले. त्यानुसार प्रत्येक दिवसाला 45 हजार 628.57 उंदीर मारण्यात आले, म्हणजेच प्रत्येक मिनिटाला 31.64 उंदीर मारण्यात आले. प्रत्येक दिवसाला मारलेल्या उंदरांचे वजन 9125.71 किलो इतके होते.
मंत्रालयात मारलेल्या इतक्या उंदरांचे दफन किंवा विल्हेवाट कुठे आणि कोणी केली ती जागा दाखविणार का व कसे केले ते सांगणार का ? मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी विष आणण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग व गृह विभागाची परवानगी घेतल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत नाही, असं सांगत धर्मा पाटलांनी जे विष घेतलं ते या विषामधलंच होतं असा खळबळजनक आरोपही खडसेंनी केलाय.
- मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाला
- फाईल कुडतरनं असे प्रकार घडू लागले
- मग ठरलं उंदरांना मारण्याची विशेष मोहीम घेतली त्यात लक्षात आल मंत्रालयात 3 लाख 19 हजार 400 उंदीर आहेत
- काही पांढरे, काही काळे, काही गलेलठ्ठ आणि काही लहान होते
- अशा उंदरांचा बदोबस्त करण्यासाठी टेंडर काढण्यात आलं
- सहा महिन्यात उंदीर संपवण्यात यावा
- नवीन वाढले तर त्यात समाविष्ट केले जातील
- वर्क ऑर्डरमधये कामाचा कालवाधी 2 महिन्यांचा नंतर करण्यात आला
- पण प्रत्यक्षात सात दिवसात हे काम झालं असं दाखवण्यात आलं
- प्रत्येक दिवसाला 45,628.57 उंदीर मारण्यात आले
- प्रत्येक मिनिटाला 31.64 उंदीर मारहण्यात आले
- प्रत्येक दिवसाला मारलेल्या उंदरांचे वजन 9125.71 किलो होते
- म्हणजे 9 टन 125 किलो म्हणजे एक ट्रक उंदिर मारल्याचे रेकॉर्ड आहे
- इतक्या मारलेल्या उंदरांचे दफन किंवा विल्हेवाट कुठे आणि कोणी केली ती जागा दाखविणार का व कसे केले ?
- मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी विष आणण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग व गृह विभागाची परवानगी घेतल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत नाही
- मंत्रालयात गृह विभाग व सामान्य प्रशासन विभागाची परवानगी न घेता विष कसे आणले
- ज्या मजूर संस्थेस उंदीर मारण्याचे काम देण्यात आले त्या संस्थेकडे विष हाताळण्याचा परवाना आहे का
- मंत्रालयात ज्या माळ्यावर व ज्या विभागात विष ठेवण्यात आले त्या विभागप्रमुखाला विष ठेवल्याची माहिती देण्यात आल्याचे व परवानगी घेतल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत नाही
- धर्मा पाटलांनी जे विषय घेतलं ते या विषामधलंच होतं
- मुंबई महापालिका दोन वर्षामध्ये 6 लाख उंदीर अख्या मुंबईत मारते
- संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांना उंदिर मारण्याचा विक्रम केल्याबद्दल पारितोषिक देणार का ?