मुंबई : आदित्य ठाकरे यांची जनादेश यात्रा सुरू आहे. यामधून भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांना प्रोजेक्ट केलं जातं आहे. तेव्हा मुख्यमंत्री पदाची मागणी, इच्छा महत्वाकांक्षा हे शिवसेनेला असणे गैर नाही. पण प्रत्येकाची महत्वाकांक्षा व्यवहारात येते असे नाही असा टोला चंद्रकांत पाटील यांनी यावेळी शिवसेनेला लगावला आहे.
युती सत्तेत यावी असा प्रयत्न आहे. शिवसेनेनं काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, युतीचा मुख्यमंत्री कोण हे बैठकीत ठरेल, उद्धव ठाकरे - अमित शाह - देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान याआधी, 'मीच मुख्यमंत्री होणार, मी फक्त भाजपचाच नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येण्याचा निर्धार व्यक्त केला होता. ही निवडणूक युतीच्या माध्यमातूनच लढणार, याबद्दल शंका बाळगू नका, हे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला जोरदार टोला हाणला आहे. आपल्या मित्रपक्षामध्ये बऱ्याच लोकांना बोलायची खुमखुमी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
युतीमध्ये लढत असताना कोणत्या जागा आपल्या आणि कोणत्या जागा मित्रांच्या याचा निर्णय लवकरच होणार, असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी प्रोजेक्ट केलं जात आहे.