मुंबई : '२४ ऑक्टोबरला विधानसभेचा निकाल लागला. विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना महायुतीला जनतेने जनादेश दिला. पण शिवसेनेने भाजपसोबत येण्यास नकार दिला. चर्चा न करता आमच्यासाठी सर्व मार्ग खुले आहेत असं म्हटलं. २९ ऑक्टोबरची बैठक शिवसेनेने रद्द केली. मातोश्रीवरुन सिल्व्हर ओकला जायला तयार आहेत. पण भाजपसोबत चर्चा केली नाही. आम्ही मातोश्रींची गरिमा राखली. भाजपचे नेते मातोश्रीवर जायचे. पण त्यांना हॉटेलमध्ये जावं लागलं.'
संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली असं म्हणत संजय राऊतांच्या तोंडी खंजीर खुपसण्याची भाषा शोभत नाही अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली.
'जनादेशाचा शिवसेनेने अपमान केला. पहिल्या दिवसापासूनत अडीच वर्ष-अडीच वर्ष नावाचा विषय सुरु केला. बसून चर्चा केली नाही. पहिल्यास पत्रकार परिषदेत आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत. असं म्हटलं. राष्ट्रवादीला भेटायला वेळ होता. पण भाजपला भेटण्यास वेळ नव्हता.'
'शिवसेनेचे काँग्रेस-राष्ट्रवादीवर प्रेम वाढत गेलं. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. महाशिवआघाडीतला शिव सोडला. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी सोडली. उद्धवजी संजय राऊत यांना आवरत नाही. पाठित खंजीर खुपसण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही. तुम्ही एकदाही चर्चा केली नाही. संजय राऊत यांनी शिवसेनेची आणि महाराष्ट्राची वाट लावली.' अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केली.