मुंबई: आपला स्वातंत्रदिन महाराष्ट्रात मंगळवारी अत्यंत जोश आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला गेला. मुंबई आणि कोकणातील काही भागात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे कार्यक्रमात काही अडचणी आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवासस्थानी आणि मंत्रालयात ध्वजारोहण केले.
राजभवनातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्र आणि तामिळनाडूचे राज्यपाल सी.वी. राव या खास दिवशी चैन्नईत असतील आणि स्वतंत्रता दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.
#Maharashtra CM Devendra Fadnavis unfurls the tricolor in Mumbai #IndependenceDayIndia pic.twitter.com/cAlwVAGP3F
— ANI (@ANI) August 15, 2017
मुंबई उच्च न्यायालय, मध्य रेल्वे, पश्चिम आणि कोकण रेल्वेच्या मुख्यालयात आणि छत्रपति शिवाजी महाराज इंटरनॅशनल एयरपोर्टवर ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
राज्यातील शाळा, कॉलेज, विविध राज्ये, केंद्र सरकारी कार्यालये, कंपन्या, गावे, सामाजिक-सांस्कृतिक संघटना, कॉर्पोरेट कार्यालये आणि इतर अन्य ठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गायले गेले. मुंबई आणि राज्यभरातील विविध ठिकाणी स्वतंत्रता दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.