मुंबई : काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पुत्रानं कामत यांना मुखाग्नि दिला. कामत यांचं पार्थिव अंतिम दर्शनसाठी त्यांच्या चेंबूर निवासस्थानी ठेवण्यात आलंय.
श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी पोहचलेत. त्याच बरोबर भाजपचे कॅबिनेट मंत्री प्रकाश मेहता,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे,माजी मंत्री नसीम खान यावेळी हजर होते. चेंबूरच्या चरई स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीयमंत्री गुरुदास कामत यांच बुधवारी सकाळी दिल्लीत निधन झालं. त्यानंतर काल रात्री दहा वाजेच्या सुमारास गुरुदास कामत यांच पार्थिव दिल्लीहुन मुंबईत आणण्यात आलं. विमानतळावरून कामत यांच पार्थिव त्यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी दाखल झालं तेव्हा शेकडोच्या संख्येत कार्यकर्ते हजर होते. त्याचबरोबर भाजपचे कॅबिनेट मंत्री प्रकाश मेहता, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री नसीम खान यावेळी उपस्थित होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी ८.३० ते १०.३० पर्यंत ठेवण्यात आले होते.