मुंबई : माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेंतर्ग तमंगळवारी मातोश्रीवर ठाकरे कुटुंबियांची आरोग्य तपासणी केली. मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व प्रभागातल्या पथकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची तसेच परिवारातल्या इतर सदस्यांची आरोग्यविषयक तपासणी केली. सर्वांची ऑक्सिजन पातळी, तापमान तपासले. यावेळी मुख्यमंत्र्यांनीही पथकाशी चर्चा केली.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेने चांगलाच वेग घेतला असून मंगळवारी सकाळी वांद्रे पूर्व येथे मातोश्री निवासस्थानी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व प्रभागातील पथकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांची आरोग्यविषयक तपासणी केली.
यामध्ये त्यांनी सर्वांची ऑक्सिजन पातळी, तापमान तपासले व आरोग्यविषयक माहिती भरून घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या पथकाशी चर्चा करून या मोहिमेची अंमलबजावणी कशा रितीने केली जाते त्याविषयी माहिती घेऊन उपयुक्त सूचना केल्या.