मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन केलं आहे. लॉकडाऊन करूनदेखील नागरिक सतत कोरोना नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. रस्त्यांवर वाहतूक कोंडी आणि वर्दळ पूर्वी प्रमाणे आहे. म्हणून मुंबईमधील अनावश्यक वाहतूक थांबवण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठी कलर कोड देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेमंत नगराळे यांनी सांगितल्याप्रमाणे कलर कोडमध्ये लाल, हिरवा आणि पिवळ्या रंगाचा समावेश असणार आहे. तर आजपासून स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना नि: शुल्क कलर कोड देण्यात येत आहेत. त्यामुळे उद्यापासून वाहतुकीसाठी नियम अधिक कठोर होतील.
Moving out for essentials? Know your stickers-
Red-For medical services vehicles
Green-For eatables/food transport vehicles
Yellow-For vehicles of essential workers
W.e.f. 8pm on 18 Apr-7am on 1 May#EssentialStickers pic.twitter.com/Mr6eoSMxwx
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 17, 2021
लाल रंगाचं स्टिकर्स डॉक्टर, नर्स, आरोग्य व्यावसायिक, वैद्यकीय पुरवठा, रुग्णवाहिका इत्यादींसाठी असतील. हिरव्या रंगाचं स्टिकर्स सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ, दूध, बेकरी उत्पादने, भाज्या, फळे यांसाठी असणार आहे. तर पिवळ्या रंगाचे स्टिकर इतर अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांना पिवळा रंग देण्यात आला आहे.
कोरोना काळात नव्या वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई देखील करण्यात येणार आहे. फक्त आत्यावश्यक सेवेतील वाहतुकीला कलर कोड देण्यात येणार आहे. त्यामुळे विनावश्यक फिरणाऱ्यांवर सरकारची करडी नजर असणार आहे.