मुंबई : मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आता मुंबईत ४५ वर्षांवरील व्यक्तींना थेट लसीकरण केंद्रावर कोवीशिल्ड लस घेता येणार आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी लसीकरण केंद्रावर ही सुविधा उपलब्ध असणार आहे.
आतापर्यंत ६० वर्षांवरील व्यक्तींना नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर लस दिली जात होती. तसंच मुंबईत रहिवासी असलेल्या १८ ते ४४ वयोगटातील आणि उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांना वैध पुरावा सादर केल्यास त्यांना कूपर, राजावाडी आणि कस्तुरबा इथं लस दिली जाणार आहे.
गुरूवार, शुक्रवार आणि शनिवारी कोविन अॅपवर नोंदणी केलेल्यांनाच लस दिली जाणार आहे.