मुंबई : पुण्यातले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामिनावर आता २२ फेब्रुवारीला निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे, त्यांच्यावरची अटकेची तलवार २२ फेब्रुवारीपर्यंत टळली आहे.
डीएसकेंच्या खटल्यावर आजचा अंतिम युक्तीवाद संपला. मात्र आज पुन्हा डीएसके ५० कोटी रुपये भरण्यात अपयशी ठरले. पैसै जमा झाले आहेत मात्र भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी डीएसकेंनी केली. त्यावर, आज मुदतवाढीची अपेक्षा ठेवू नका अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं डीएसकेंना तंबी दिली. आजचा युक्तीवाद हा अंतिम असेल असंही न्यायालयानं बजावलं.
इतक्या गुंतवणूकदारांचे पैसे बुडवून डीएसके आजही सुखानं झोपतात, असा खरमरीत शब्दात न्यायालयानं सुनावलंय. बुलडाणा अर्बन बँकेनं डीएसकेंच्यावतीनं पैसे भरण्याची तयारी दर्शवलीय. मात्र, बुलढाणा अर्बन बॅंकेचा प्रस्ताव प्रभुणे कंपनीसारखा फोल ठरणार नाही, याची ग्वाही कोण देणार? असा सवाल न्यायालयानं केलाय.
सिंगापूर कंपनीकडून पैसे घेत असल्याचा फोल ठरलाय – हायकोर्ट
२३२ कोटींची गुंतवणूकदारांची देणगी देणं बाकी असल्याचे डिएसकेंची न्यायालयात माहिती
आम्ही चाकोरी बाहेर जाऊन हे प्रकरण हाताळतोय – हायकोर्ट
गुंतवणूकदारांचे पैसे डीएसकेंची पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीषच्या खात्या वळते करण्यात आलेत - सरकारी वकील
बुलढाणा अर्बन बॅंकेचा प्रस्ताव प्रभुणे कंपनी सारखा फोल ठरणार नाही याची ग्वाही कोण देणार - हायकोर्ट
शनिवारी बुलढाणा अर्बन बँकेची बोर्ड मिटींग होईल अशी माहिती बॅंकेकडून देण्यात आली - डीएसके
आज डीएसके प्रकरणातील युक्तीवाद अंतिम राहील - हायकोर्ट
डीएसके - पैसे जमा झालेत पण ते भरण्या करता काही मुदत वाढ द्यावी
न्यायमूर्ती - डीएसके तुम्हाला जवळपास तीन वेळी मुदतवाढ दिली त्यामुळे आज मुदतवाढीची अपेक्षा ठेवू नका
न्यायमूर्ती - डीएसके पुन्हा एकदा ५० कोटी रुपये भरण्यात अपयशी
डी एस के यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केलाय. त्यावर गेल्या वेळी कोर्टानं डीए के यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. ठेवीदारांचे पैसे परत न केल्या प्रकरणी डी एस कुलकर्णी यांच्या विरोधात पुण्यात गुन्हे दाखल झालेत.या प्रकरणी अटक टाळण्यासाठी डी एस केंनी हायकोर्टात धाव घेतलीय. अटक टाळण्यासाठी डी एस के यांना ५० कोटी रुपये जमा करण्यास सांगण्यात आल होतं, पण ते जमा करण्यास डी एस के अजूनही अपयशी ठरले आहेत. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत कोर्टाने काहीही करा पण पैसे जमा करा असं म्हणत स्वत: डी एस के यांनी कोर्टात हजर राहावं असं सांगितलं होतं.