EPFO Scam | 37 नाही 100 कोटीहून अधिकचा असू शकतो EPFO घोटाळा; 8 अधिकारी सस्पेंड; CBIची चौकशी सुरू

आतापर्यंत अंतर्गत लेखापरीक्षणातून 37 कोटींचा घोटाळा समोर आल्याची माहिती समोर आली होती. 

Updated: Aug 19, 2021, 04:40 PM IST
EPFO Scam | 37 नाही 100 कोटीहून अधिकचा असू शकतो EPFO घोटाळा; 8 अधिकारी सस्पेंड; CBIची चौकशी सुरू title=

मुंबई : कर्मचारी भविष्य निधी संघटनमध्ये 100 कोटींहून अधिकच्या घोटाळ्याचे प्रकरण समोर आले आहे. EPFOने आपल्या मुंबई रिजनच्या 8 कर्मचाऱ्यांना सस्पेंड केले आहे. सोबतच CBI ने चौकशी सुरू केली आहे.

सीबीआय 2017 पासूनच्या सर्व व्यवहारांची चौकशी करणार आहे. आतापर्यंत अंतर्गत लेखापरीक्षणातून 37 कोटींचा घोटाळा समोर आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता हा घोटाळा 100 कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

कसा झाला घोटाळा
लॉकडाऊन काळात लोकांना दिलासा देण्याच्या उद्देशाना EPFOने पैसे काढण्याच्या नियमांमध्ये शिथिलता दिली होती. ज्याचा फायदा अधिकाऱ्यांना घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

उत्पन्न कमी होणे किंवा नोकरी गेल्यामुळे असंख्य लोकांनी PF मधून पैसे काढण्यासाठी अर्ज केला होता.परंतु त्याचे सेटलमेंट करणे गरजेचे असते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या लॉगिन आणि पासवर्ड दुसऱ्या अधिकाऱ्यांसोबत शेअर केले. ज्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त सेटलमेंट होऊ शकतील. 

काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी याचा गैरफायदा घेत अनेक खात्यांमधून पैसे गायब केले. असल्याची माहिती मिळत आहे.