Video : अजित पवारांविषयीचा प्रश्न, टोला मात्र फडणवीसांना; रोहित पवार जरा स्पष्टच बोलले, त्यांनी...

Rohit Pawar : राज्याच्या राजकारणाला दर दिवशी एक नवं वळण मिळत असतानाच आता नेतेमंडळींच्या वक्तव्यांकडे सर्वांचं लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे.   

सायली पाटील | Updated: Oct 5, 2024, 09:34 AM IST
Video : अजित पवारांविषयीचा प्रश्न, टोला मात्र फडणवीसांना; रोहित पवार जरा स्पष्टच बोलले, त्यांनी... title=
Exclusive ncp sharad pawar party mla rohit pawar on devendra fadnavis latest political news to the point interview Video

Rohit Pawar Exclusive Interview : विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election 2024) अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरीही त्या धर्तीवर राज्यातील घडामोडींना मात्र चांगलाच वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली असताना इथं विरोध गटातूनच सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान केलं जात असताना दिसत आहे. मागील काही महिन्यांमध्ये किंबहुना मागील दोन वर्षांमध्ये राज्यातील राजकारण ढवळून निघालं असल्यामुळं येत्या विधानसभा निवडणुकीत सत्तेसाठीची समीकरणं नेमकी कशी असतील याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. त्यातच आता भाजपच्या रणनितीवर कटाक्ष टाकत थेट फडणवीसांनाच आव्हान केल्यामुळं रोहित पवारांचं नाव चर्चेचा विषय ठरत आहे. 

'झी 24तास'ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये (NCP Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षातील धडाडीचे युवा नेते, रोहित पवार यांनी थेट फडणवीसांनाच Challange केलं. दुसऱ्यांना झुंजवण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांनी कर्जत जामखेडमधून लढावं अशा शब्दांत रोहित पवारांनी आव्हान दिलं.  'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. 

जामखेडमधून अजित पवार (Ajit Pawar) निवडणूक लढणार का? या प्रश्नावर बोलताना त्यांनी फडणवीसांवर टीका केली. कर्जत जामखेड हा मतदारसंघ महायुतीत (BJP) भाजपच्या वाट्याला आहे. त्यामुळं (Ajit Pawar) अजित पवारांना जामखेडमधून उतरवण्यापेक्षा फडणवीसांनी जामखेड लढवावं असं रोहित पवार म्हणाले. इतरही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देत रोहित पवार यांनी येत्या काळात आपल्या पक्षाची नेमकी काय भूमिका असेल यावर एक दृष्टीक्षेप टाकला. 

फडणवीसांप्रमाणं अजित पवारांना चॅलेन्ज द्याल का? असा प्रश्न केला असता ती जागाच भाजपकडे जाणार, काही झालं तरीही भाजपच ती जागा घेणार. ही सगळी गोष्ट माहित असताना उगाच यांना त्यांना चॅलेन्ज कशाला? असं थेट उत्तर त्यांनी दिलं. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : ऑक्टोबर हीट अन् वादळी पाऊस... राज्यात चार दिशांना हवामानाचे चार वेगळे अंदाज 

दरम्यान, तिथं अजित पवार यांची चर्चा एका वेगळ्याच कारणामुळं सुरू असून, आता राजकीय वर्तुळात त्यांची पुढील भूमिका नेमकी काय असेल याचीच अनेकांना उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी (Baramati) बारामतीतून माघार घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. 'जो उमेदवार देईन त्याला निवडणून आणा', असं जाहीर आवाहन अजित पवारांनी बारामतीकरांना केलं. त्यांच्या या आवाहनानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. मात्र यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली.