मुंबई : आठवड्याभरात सोन्याच्या दरात (Gold Price Today) सातत्याने चढ-उतार पाहायला मिळाला. या दरम्यान सोन्याच्या दरात 410 रुपयांनी वाढ झाली. तर दुसऱ्या बाजूला चांदीही 123 रुपयांनी महागली. सराफा बाजारात सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे दर हे 48 हजार 273 इतके आहे. तर चांदी प्रति किलो (Silver Rate) 68 हजार 912 इतके आहे. (Experts say the price of 10 grams of gold is likely to touch 60 thousand in the coming weeks)
इंडिया बुलियन अॅन्ड ज्वेलर्स संघटनेनुसार (India Bullion And Jewllers Association), कामकाजाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच 9 जुलैला सोन्याचे 10 ग्रॅमचे दर हे 47 हजार 863 रुपयांवर होते. हाच दर 16 जुलैला 48 हजार 273 रुपयांवर पोहचला. यानुसार सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात 410 रुपयांची वाढ झाली आहे.
इंडिया बुलियन मार्केटचं ट्वीट
इंडिया बुलियन अॅन्ड ज्वेल्स संघटनेच्या ibjarates.com नुसार, कामकाजाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 16 जुलैला शुद्ध 1 ग्रॅम सोन्याचे दर हे 4 हजार 827 रुपये, तर 22 कॅरेट असलेल्या 1 ग्रॅम सोन्याची किंमत ही 4 हजार 663 आणि 18 कॅरेट असलेल्या 1 ग्रॅम सोन्याचे मूल्य हे 3 हजार 862 इतके आहेत. तर चांदी प्रतिकिलो 68 हजार 912 रुपये इतके आहे.
सोने खरेदीबाबत गुतंवणूक तज्ज्ञांचं मत काय?
2021 च्या अखेरपर्यंत प्रति तोळा सोन्याचे दर हे 60 हजारचा आकडा पार करतील, अशा शक्यता गुंतवणूक तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक ही सर्वोत्तम ठरु शकते. सोन्यातील गुंतवणूकीबाबत म्हणायचं झाल्यास, गेल्या वर्षभरात सोन्यामुळे 28 टक्के फायदा मिळाल आहे. भविष्यकालीन गुंतवणूकीसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सर्वोत्तम पर्याय आहे.
अनेकदा सोन्यात भेसळ केली जाते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी सरकारने सोन्याची शूद्धता सागंणारं (Bis Care App) अॅप आणलं आहे. त्यामुळे स्वत: ग्राहक सोन्याची शूद्धता तपासू शकतात.