मुंबई : Hindustani Bhau's judicial custody : हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास पाठक याला वांद्रे न्यायालयात आज हजर करण्यात आले. आज पोलीस कोठडी संपत असल्याने न्यायालयात हजर केले असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. हिंदुस्तानी भाऊला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विद्यार्थी आंदोलन प्रकरणी हिंदुस्तानी भाऊला धारावी पोलिसांनी अटक केली होती. (Hindustani Bhau's judicial custody increased again)
हिंदुस्थानी भाऊ याला 5 फेब्रुवारीपर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या नुकसानाबाबत न्यायालयात बेशर्त माफी मागण्यात आल्याचे वकील अॅड. महेश मुळ्ये यांनी सांगितले. याबाबत अधिक चौकशी करण्यासाठी हिंदुस्थानी भाऊला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
विकास पाठक तथा हिंदुस्थानी भाऊ याला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर एक दिवसाची वाढ करण्यात आली होती. आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडी हवी, अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने एक दिवसांची कोठडी सुनावली होती. दरम्यान, दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी चिथावल्याप्रकरणी आणि मुंबईतल्या धारावीत आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
हिंदुस्थानी भाऊच्या मागे कोणी राजकीय संस्था आहे का? तसेच त्याला आर्थिक मदत कुठून मिळाली याचा याचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडकवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.