मुंबई : अल्पभूधारक शेतक-यांना खरीपातल्या पेरणीसाठी १० हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. ही रक्कम तातडीनं देण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
आधीच पेरण्या झालेल्या आहेत, तरीही आवश्यक शेतक-यांना ही रक्कम दिली जाईल. राष्ट्रीयकृत बँकांमार्फत दिल्या जाणा-या या कर्जाची हमी राज्य सरकार घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
अनेक शेतकरी पीककर्ज काढायचे आणि ती रक्कम दुस-या बँकेत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकायचे. त्यातून त्यांना दरवर्षी साडे सहा हजार रुपयांचा लाभ मिळायचा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.