या कारणासाठी आदित्य ठाकरे यांचाही अयोध्या दौरा पुढे ढकलला

युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे १० जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते.   

Updated: Jun 5, 2022, 11:43 AM IST
या कारणासाठी आदित्य ठाकरे यांचाही अयोध्या दौरा पुढे ढकलला title=

मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Adity Thackaraey ) हे येत्या १० जूनला अयोध्येला जाऊन राम लल्लाचे दर्शन घेणार होते. पण त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली. 

आदित्य ठाकरे यांच्यासोबत अनेक शिवसेना नेते, आमदार अयोध्येला जाणार आहेत. तेथे राम लल्लाचे दर्शन घेऊन शरयू नदीची आरती करणार आहेत. आम्हाला या डाऊर्यंत शक्तिप्रदर्शन करायचे नाही तर प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन घ्यायचे आहे असेही राऊत यांनी सांगितले.

अयोध्या दौऱ्यात आम्ही राजनीतिक भावनेने नाही तर भक्तिभावाने, श्रद्धा भावाने जात आहोत. गेली दोन वर्ष कोरोनामुळे तेथे जाता आले नाही. त्यासाठीच १० जूनला हा दौरा आयोजित करण्यात आला होता. 

मात्र, १० जून रोजी राज्यसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी सर्व मंत्री, आमदार हे उपस्थित राहणे आवश्यक आहेत. त्यासाठी आदित्य ठाकरे यांच्यासह आमदार, मंत्री हे १५ जूनला अयोध्येला जाणार असल्याचे राऊत म्हणाले.