मुंबई: येत्या काही वर्षांत मुंबई आणि कोकणचा काही भाग समुद्राखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. एका मोठ्या घटनेमुळे समुद्राची पातळी मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती आहे.
येत्या काही वर्षांमध्ये मुंबई आणि कोकणचा काही भाग समुद्राखाली जाण्याची भीती आहे. जगातला सर्वात मोठा बर्फाचा साठा म्हणजे अंटार्टिका खंड आहे. या अंटार्टिकाच्या पश्चिमेकडे आहे थ्वाईट्स ग्लेशियर आहे. या हिमखंडाचा एक मोठा भाग तुटून समुद्रात पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ह्या हिमनगाचा आकार आंध्र प्रदेशसारख्या मोठ्या राज्याएवढा अवाढव्य आहे.
अमेरिकन जिओग्राफिकल युनियनच्या वार्षिक बैठकीत हा शोधनिबंध सादर करण्यात आला आहे. यामध्ये थ्वाईट्स ग्लेशियरबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. ग्लोबल वॉर्मिंगमुळे थ्वाईट्स ग्लेशियर वितळत असून त्याला एक मोठी भेग पडल्याचं या शोधनिबंधात म्हटलं आहे.
ही भेग रुंदावत गेली तर हा अवाढव्य हिमनग समुद्रात कोसळेल आणि त्यामुळे समुद्राची पातळी तब्बल 5 टक्यांनी वाढण्याची भीती व्यक्त कऱण्यात आली आहे. शिवाय हा हिमनग वेगळा झाला तर उर्वरित ग्लॅशियर वितळण्याचा वेग आणखी वाढून समुद्राच्या पातळीत वाढ होऊ शकते.
या वर्षाच्या सुरूवातीलाच नासानं थ्वाईट्स ग्लेशियरला पडलेली भेग भूगर्भतज्ज्ञांच्या निदर्शनास आणून दिली होती. 1980नंतर या हिमखंडातील 600 अब्ज टन बर्फ वितळला आहे. आता आंध्र प्रदेशएवढा हिमनग समुद्रात आला, तर ती महाप्रलयाची नांदीच ठरणार आहे.
थ्वाईट्स ग्लेशियरचं दुसरंही नाव आहे. डूम्स डे ग्लेशियर, डूम्स डे म्हणजे महाप्रलयाचा दिवस. वेळीच ग्लोबल वॉर्मिंगबाबत उपाययोजना केल्या नाहीत तर मुबंई-कोकणातही सुमद्र घुसण्यास वेळ लागणार नाही.