मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस

मुंबई आणि उपनगरांत आज पहाटेपासून मुसळधार पाऊस होत आहे. कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि ठाण्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. ठाण्यात पावसाने थैमान घातले आहे.

Updated: Jun 25, 2017, 10:09 AM IST
मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस title=

मुंबई : मुंबई आणि उपनगरांत आज पहाटेपासून मुसळधार पाऊस होत आहे. कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि ठाण्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. ठाण्यात पावसाने थैमान घातले आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफ लाईन लोकलसेवाही जरा उशीराने सुरू आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेचा आज मुंबईत मेगाब्लॉकही आहे. 

मात्र खरा मेगाब्लॉक हा आज पहाटेच्या पावसानेच सुरू केला. सकाळी १० वाजता पावसाने थोडी विश्रांती घेतली होती, मात्र रिपरिप काही ठिकाणी सुरूच होती.