मुंबई : ऐन गणपती उत्सवात पाऊस पडण्याची शक्यता हवामाना खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील पाच ते सात दिवसांत म्हणजेच गणपतीमध्ये म्हणजेच दोन ते तीन सप्टेंबरदरम्यान कोकण आणि मुंबई परिसरात चांगला पाऊस पाडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. कमी दाबाच्या पट्याचा प्रवास पश्चिम दिशेला सुरू झाल्यावर त्याचा प्रवास हा पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने होईल. दक्षिण कोकणात याचा जास्त प्रभाव दिसेल. हा कमी दाबाचा पट्टा पुढे सरकत दक्षिण कोकण रायगड आणि मुंबईपर्यंत दिसू शकतो. त्यामुळे चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भ आणि मराठवड्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२८ ऑगस्टपर्यंत संपूर्ण देशात १०१ ते १०२ टक्के सरासरी पाऊस झाला आहे. मध्य आणि दक्षिण भारतातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर विदर्भात सरासरी इतका पाऊस आहे. पण मराठवाड्यात उणे २९ टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, मराठवाड्यात ७ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान जास्त पाऊस झाला. तर मध्य महाराष्ट्रात ससरासरी पेक्षा जास्त ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सरासरी पाऊस पडला, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.