मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारला अखेर मुहूर्त सापडलाय आहे.
येत्या १८ ऑक्टोबर दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निवडक शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे वळते करण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात १० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. तर, उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात ऑक्टोबर संपण्यापूर्वी कर्जमाफीचे पैसे जमा झालेले असतील, अशी ग्वाही सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.
दिवाळीत कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार हे नक्की.